“स्वराज दुनिया “हे मराठी भाषेत प्रकाशित होणारे मासिक असून नोंदणीकृत आहे. आमचा उद्देश देश दुनिया मधील विविध घटक आणि विविध राज्यपद्धती यांचे वास्तव सरकार-नागरिक यांचे समोर आणणे आणि स्वराज ,ग्रामस्वराज,हिंदवी,हिंडस्वराज ही श्रींची इच्छा म्हणजे पक्षमुक्त लोकतंत्र Party Less Democrocy असा काही बदल,परिवर्तनाचा विचार सर्वांपुढे घेऊन जाणे.सर्व समाजातील ,सर्वांनी शाशवत विकास,नैसर्गिक जीवनपद्धती चा अवलंब करणे यासाठी प्रयत्न करणे.सर्वांना आरोग्य,शिक्षण,रोजगार,एकसमान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आदर्श जीवनपद्धती,आदर्श राज्यपद्धती, आदर्श नागरिक घडवून आदर्श गाव,स्मार्ट व्हिलेज आणि स्वावलंबी खेडे,जागतिक देश कसा निर्माण करता येईल याबाबत विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वराज दुनिया हे मासिक माध्यमातून प्रयत्नशील राहील ,यासाठी अखंड प्रयत्न करील
“स्वराज दुनिया” हे मासिक समाजातील वास्तव, ग्रामीण जीवन, राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्न आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे कार्य करत आहे. आम्ही पत्रकारितेला एक सेवा मानतो आणि सत्य, पारदर्शकता व सामाजिक बांधिलकी जपत वाचकांपर्यंत मुद्देसूद आणि विश्वासार्ह माहिती पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे.
संपादक :शिवाजी बबन खेडकर
गाव हा विश्वाचा नकाशा| गावावरून देशाची परीक्षा | गावची भंगता अवदशा | येईल देशा|| …संत तुकडोजी महाराज
काही अल्प लोकांच्या हातात सत्ता फेउन स्वराज्य निर्माण होणार नाही तर सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य जेव्हा जनतेमध्ये येईल तेव्हाच खरे स्वराज्य साकार होईल….महात्मा गांधी
स्वराज्य हा माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच…लोकमान्य टिळक